संपादक-२०२४ - लेख सूची

मनोगत

स्नेह शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींचा विचार करताना अनेकवेळा आपण धोरणे, अंमलबजावणी, गुणवत्ता, सरकारच्या अंदाजपत्रकातील शिक्षणासाठीची तरतूद ह्या अंगांनी विचार करतो. प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्यांचे अनुभव खूप वेगळे असतात. एखादे धोरण आणि त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांसाठी जाचक तर ठरतेच; पण बरेचदा अपेक्षित परिणामही त्यातून साधले जात नाहीत. हाती उरते ते केवळ धोरणांचे पोकळ समर्थन किंवा रकानेभरती!! हीच …

आवाहन

स्नेह. गेल्या काही महिन्यांत भारतात एक big fat indian wedding पार पडले. ज्यात पंतप्रधानांपासून सगळ्या दिग्गजांनी हजेरी लावली. ह्या लग्नसंमारंभासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या सरबराईचा झगमगाट आपण सगळ्यांनी पाहिला. ह्याचदरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ऐंशी कोटी भारतीयांना अन्नधान्य मोफत देण्याची योजना ह्यापुढे आणखीन पाच वर्षे राबवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. निम्म्याहून अधिक भारतीयांना अन्न मिळत नसल्याची …

मनोगत

स्नेह जून २०२४ ला निवडून आलेल्या नवीन सरकारचे स्वागत आणि शुभेच्छा! निवडून आलेल्या सरकारने जनतेच्या समस्या समजून घेऊन काम करावे अशी अपेक्षा ठेवावी लागणे म्हणजे खरे तर मतदान करणाऱ्या जनतेप्रति आणि निवडून येणाऱ्या राज्यकर्त्यांप्रति अविश्वास दाखवण्यासारखे आहे. पण इलाज नाही. आपल्या निवडणुकपद्धतीतील पारदर्शिकता कधीच लोप पावली आहे आणि सत्तेच्या उन्मादापुढे आपण लोकशाहीची विटंबना चालवली आहे …

मनोगत

स्नेह. येत्या एप्रिल/मे मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आजचा सुधारक’चा अंक प्रकाशित करतो आहोत. आव्हाने अनेक आहेत. भाजप आत्तापासूनच आपल्या सलग तिसऱ्या विजयाच्या दुदुंभी फुंकत आहे. INDIA आघाडी पर्याय म्हणून समोर यायला धडपडत आहे. निवडणुकांआधी प्रचार, अपप्रचार, कुप्रचार ह्यांचा कोलाहल असतोच. त्यात आता सोशल मीडिया, एआयचा वाढता वापर यांतून वाढलेला गोंधळ!! अश्यात सामान्य नागरिक मतदाता म्हणून …

आवाहन

लेखाजोखा सरकारचा – नागरिक मूल्यमापन विशेषांक आपल्या प्रातिनिधिक लोकशाहीत दर पाच वर्षांनी आपणच लोकप्रतिनिधी निवडून देत असल्यामुळे त्यांची कामे लोककेंद्रित असणे अपेक्षित असते. यासाठी सत्ताधारी पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांपैकी किती कामे केलीत वा किती केली नाहीत ह्याचा आढावा वेळोवेळी घेत राहणारी सक्रिय यंत्रणा असायला हवी. माध्यमांची भूमिका खरे तर इथे महत्त्वाची ठरते. परंतु सद्य:स्थितीत हे …

मनोगत

चित्र : तनुल विकमशी आपल्या समाजात नास्तिकांची संख्या किती या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळणे कठीणच! याचे एक कारण म्हणजे याच्या नोंदणीची कुठे सोय नाही. आणि दुसरे म्हणजे नास्तिक असणारे अनेकजण उघडपणे आपली अशी ओळख देऊ इच्छित/धजावत नाहीत. खरे तर संशयवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांतून सुरू होणारा प्रवास स्वाभाविकपणे नास्तिकतेकडे जातो. विज्ञान, तंत्रज्ञान यांतून मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग …

आवाहन

स्नेह सध्याच्या सामाजिक वातावरणात वर्तमानपत्रे, निरनिराळ्या वाहिन्या, सोशल मीडिया या सर्व माध्यमांना आपल्या कह्यात घेऊन देव-धर्माचा आणि बुरसट परंपरांचा कर्कश कोलाहल करणाऱ्यांचा उन्माद वाढताना दिसतो आहे. धर्म, धार्मिक आस्था यांमुळे जगभरात अनेक युद्धे झाली, नरसंहार झाला. अगदी अलीकडे सुरू असणारे  इस्राईल आणि हमस यांच्यामधील युद्ध याच प्रकारचे. असे असूनही मानवी जीवनात धार्मिक आस्था, श्रद्धा यांचे …